You are currently viewing कामगारांच्या एकीतच संघटनेचे बळ असते – अशोक सावंत

कामगारांच्या एकीतच संघटनेचे बळ असते – अशोक सावंत

भाजप चित्रपट आघाडीच्या जिल्हा आणि तालुका पदाधिकारी निवड

कणकवली

संघटित किंवा असंघटित कामगारांच्या संघटना मजबूत करण्यासाठी कामगारांनी एक मताने आणि एक दिलाने संघटनेचे काम करायला हवे . कामगारांमधील एकी हेच संघटनेचं बळ असते आणि यामुळेच आपले न्याय हक्क आपण मिळवू शकतो असे संबोधन कामगार नेते तथा भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी केले .

भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे कामगार नेते तथा पालक संजय केणेकर , कामगार आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष गणेश ताठे , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय सरोज , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सत्यवान गावडे यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या जिल्हा आणि तालुका पदाधिकारी सदस्य नियुक्ती कार्यक्रमात सावंत बोलत होते . मालवण भाजप तालुका कार्यालय येथे हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला .या कार्यक्रमाला अजय नाईक आणि अशोक सावंत यांच्या सह बाबा परब – जिल्हा बँक संचालक ,विजय केनवडेवर- प्रभारी शहर मंडल अध्यक्ष ,दिपक पाटकर- नगरसेवक ,बाबा मोंडकर – जिल्हा प्रवक्ता , अजिंक्य पाताडे – माजी सभापती , भाऊ सामंत – जिल्हा कार्यकारीणी सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते . या निवड प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून आलेले महाराष्ट्र प्रदेशचे संपर्कप्रमुख अजय किशोर नाईक यांच्या उपस्थितीत भाजप चित्रपट आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गितेश शेणई आणि आणि महिला जिल्हाध्यक्षा नमिता गावकर यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या . सर्व संबंधितांना यावेळी नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली .

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली यामध्ये शेखर पाडगांवकर- जिल्हा उपाध्यक्ष ,अमित हर्डीकर- जिल्हा उपाध्यक्ष , संजय पुनाळेकर- जिल्हा सरचिटणीस ,विजय गांवकर- जिल्हा मीडिया प्रमुख ,ओमकार बांदकर- जिल्हा सचिव , अनिरुद्ध पटवर्धन- कुडाळ तालुका अध्यक्ष ,राणी नेरूरकर- कुडाळ तालुका महिला अध्यक्ष वैष्णवी नाईक- सावंतवाडी तालुका महिला अध्यक्षा , प्रवीण ठाकूर- सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष , चंद्रहास राऊळ- सावंतवाडी तालुका सदस्य हरिश्चंद्र वेंगुर्लेकर- मालवण तालुका अध्यक्ष; निर्मला टिकम- मालवण तालुका महिला उपाध्यक्ष;कावेरी आंगणे- मालवण तालुका महिला सरचिटणीस;गजानन मांजरेकर-मालवण तालुका सरचिटणीस आदींना नियुक्ती पत्रे देण्यात आली . सदरहू कार्यक्रमात जिल्ह्यातील चित्रपट , नाटक ,दशावतार आदी कला क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी मान्यवरांसमोर आपल्या समस्या मांडल्या . या समस्या भाजप पक्षाच्या माध्यमातून दूर करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी यावेळी दिले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 4 =