*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा जनसंपर्क अधिकारी कवी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम लावणी*
*श्रीराम…*
लावणी : श्रीरामाचं दर्शन घ्यायचं
रूप सोवळे डोळे भरून बघायचं
धनी मला रामाचं दर्शन घ्यायचं l
सर्वांग सुंदर असे रूप मनोहर
पोवळ्याहूनही ओठ लालसर
तेजाळ कायेपुढं आज दिपायचं
धनी मला रामाचं दर्शन घ्यायचं l
नासिका सरळ भव्य दिव्य कपाळ
केशरी लेपावर कुंकुम लाल लाल
कुंडलावरील त्रिभुवन आज पहायचं
धनी मला रामाचं दर्शन घ्यायचं l
मस्तकी मुकुटात शोभे नारायण
गळ्यात कौस्तुभ रत्न आभूषण
कुंतल फुलांच्या गंधात नहायचं
धनी मला रामाचं दर्शन घ्यायचं l
निर्मल नाभी ही ब्रहम्याचे स्थान
मेखला कटीवर सुंदर ते ध्यान
मनोभावे दोघांनी पूजन करायचं
धनी मला रामाचं दर्शन घ्यायचं l
विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664