You are currently viewing सावंतवाडी सभापतीपदाची १ एप्रिलला निवड…

सावंतवाडी सभापतीपदाची १ एप्रिलला निवड…

सावंतवाडी पंचायत समितीच्या पुढील वर्षभरासाठी होत असलेली सभापती पदासाठीची निवड प्रक्रिया १ एप्रिल रोजी होणार आहे. माजी सभापती मानसी धुरी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती, उपसभापती या पदावर कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती पदावर राणे पॅटर्ननुसार सर्वांना समान संधी मिळावी यासाठी हे पद १ वर्षाच्या कालावधी करिता सदस्यांनी दिले जाते. दरम्यान वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर राजीनामा घेऊन पुढील सदस्यांना सभापतीपदी संधी दिली जाते. गेल्या ५ वर्षात कित्येक सदस्यांना सभापती पदाची संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी सभापती पदी सौ. मानसी धुरी व उपसभापती शीतल राऊळ यांची वर्णी लागली होती. सौ.धुरी यांचा सभापती पदाचा १ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला. तर उपसभापती पदासाठी देखील लवकरच निवड प्रक्रिया होईल. ही निवड प्रक्रिया १ एप्रिलला होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =