You are currently viewing भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी म्हापण च्या गुरुप्रसाद चव्हाण यांची निवड

भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी म्हापण च्या गुरुप्रसाद चव्हाण यांची निवड

भाजपा वेंगुर्ले तालुक्याच्या वतीने सत्कार

अनुसूचित जाती जमाती मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी आपली जिल्हा कार्यकारणी जाहीर केली . यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील आसोली गावचे अनंत आसोलकर यांची जिल्हा उपाध्यक्ष व म्हापण ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद चव्हाण यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिल्हा चिटणीस निलेश सामंत व जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी गुरुप्रसाद चव्हाण यांनी आपली जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल पक्षाचे आभार मानले तसेच लवकरच वेंगुर्ले तालुक्याची अनुसूचित जाती मोर्चाची बैठक आयोजित करुन तालुका कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे सांगितले .
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , शक्ती केंद्र प्रभारी विजय ठाकुर , शक्ती केंद्र प्रमुख नाथा मडवळ , माजी उपसरपंच प्रविण ठाकुर , जेष्ठ कार्यकर्ते अनंत म्हापणकर , ग्रा.प.सदस्य संदीप खोत व संजोग परब , कमलाकर उर्फ राजु पावसकर , उपेंद्र रावले , अनु. जाती मोर्चाचे जि.का.का.सदस्य सुदेश केनवडेकर , युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण , बुथप्रमुख ११ – विष्णू विठ्ठल फणसेकर , बुथप्रमुख १२ – रामचंद्र कोचरेकर , बुथप्रमुख १४ – जगदीश म्हापणकर , बुथप्रमुख १५ – प्रदीप गवंडे , बुथप्रमुख १८ – इंद्रनील उर्फ रोहन प्रभु , बुथप्रमुख १९ – पांडुरंग शिवलकर , बुथ उपाध्यक्ष १६ – नंदकीशोर पालकर , दत्ताराम राणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा