You are currently viewing बी एस एन एल च्या गलथान कारभारामुळे बी एस एन एल केबलच्या चेंबरला भगदाड

बी एस एन एल च्या गलथान कारभारामुळे बी एस एन एल केबलच्या चेंबरला भगदाड

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; अधिकाऱ्यांना धरले धारेवर

सावंतवाडी

शहरातील माठेवाडा भागीरथी व आत्मेश्वर मंदीर रोडवरील बीएएसएन केबलच्या चेंबरला मोठी भगदाड पडली असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींंन आक्रमक पवित्रा घेत बीएएसएनएलचे मुख्य प्रबंधक श्री. देशमुख यांना फोनद्वारे संपर्क साधून परिस्थितीची गंभीरता लक्षात आणून दिली. त्यानंतर देशमुख यांनी तात्काळ सबडिव्हीजन इंजिनिअर आशिष कुमार यांना घटनास्थळी पाठवलं. यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी त्या़ंना चांगलंच धारेवर धरले. तर या प्रकारामुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी संबंधित चेंबरवर बीएसएनएलकडून नवी फरशी घालण्यात येणार आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेऊ असं आश्वासन राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना बीएसएनएल अधिकाऱ्यांन दिल. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, खानापुरे आदी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा