You are currently viewing विनामास्क फिरणाऱ्या 244 जणांवर दंडात्मक कारवाई

विनामास्क फिरणाऱ्या 244 जणांवर दंडात्मक कारवाई

सिंधुदुर्गनगरी 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात दिवसभरात 244 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

       यामध्ये पोलिसांनी 207 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 58 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगर पालिका क्षेत्रामध्ये 37 व्यक्ती या विनामास्क आढळून आल्याअसून त्यांच्याकडून एकूण 9 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ही 68 हजार 600 रुपये इतकी आहे.

       त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण 70 ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे.

       कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे, तसेच मास्क, हॅन्डसॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 18 =