You are currently viewing वंचित बहुजन आघाडीने जपली सामाजिक बांधिलकी

वंचित बहुजन आघाडीने जपली सामाजिक बांधिलकी

वंचित बहुजन आघाडीने जपली सामाजिक बांधिलकी

इचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजी शहर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागरिकांना पाणी बॉटल व नाष्टा वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्ताने जपण्यात आलेली सामाजिक बांधिलकी नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जनतेच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवून लोकशाहीच्या मार्गाने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजातील गरीब-गरजूंना मदतीचा हात दिला जातो. नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागरिकांना पाणी बॉटल व नाष्टा वाटप करण्यात आले. प्रारंभी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर दिवसभरात अनेक मान्यवरांनी कार्यक्रमस्थळी भेट देिवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यामध्य आम. प्रकाश आवाडे, अप्पर पोलिस अधिक्षक नितेश खाटमोडे पाटील, अविनाश कांबळे, शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पो.नि. सत्यजित हाके, काँग्रेसचे शशांक बावचकर, राहूल खंजिरे, संजय कांबळे, शिवसेनेचे महादेव गौड माजी आम. राजीव आवळे, मनसेचे रवि गोंदकर, प्रताप पाटील , वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट महेश कांबळे
यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − seven =