श्री.वेतोबा जत्रोस्तवाचे औचित्य साधत वेंगुर्ले भाजप च्या सदस्य नोंदणी अभियानाचा आरवली येथे २ डिसेंबर ला होणार शुभारंभ
जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई
वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुका भाजप च्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आरवली येथे २ डिसेंबर ला श्री.वेतोबा देवाच्या जत्रोस्तवाचे औचित्यावर करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी वेंगुर्ले येथे दिली.
वेंगुर्ले तालुक्यात ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर यांची संयोजक म्हणून निवड करण्यात आली असून सहसंयोजक म्हणून विष्णु उर्फ पपु परब , सौ.सुजाता पडवळ , गुरुनाथ ऊर्फ नाथा मडवळ , लक्ष्मीकांत कर्पे , वैभव होडावडेकर, अमेय धुरी यांची निवड करण्यात आली आहे. सदर अभियानाच्या शुभारंभाची माहीती देण्यासाठी वेंगुर्ले तालुका कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , संयोजक प्रशांत खानोलकर , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , सोमनाथ टोमके , नगरसेवक प्रशांत आपटे उपस्थित होते.
भारतातील सर्वात मोठी राजकीय पार्टी भाजपा ने सदस्य नोंदणी अभियान सुरु केले असुन संपुर्ण देशात १० करोड सदस्य करण्याचे उद्दिष्ट आहे. हे अभियान ५१ दिवस चालणार आहे .राष्ट्रीय अध्यक्ष मान. जे. पी.नड्डा यांनी मान. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींना सदस्यत्व बहाल करून या अभियानाची सुरुवात केली आहे .भाजपा चे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राष्ट्रीय संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीड कोटी सदस्य बनविण्याचे टार्गेट दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांची या अभियानाच्या जिल्हा संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली असुन प्रत्येक मंडलात सहा जणांची कमिटी बनविण्यात आली आहे.