You are currently viewing किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना उद्योग दर्जा; केंद्र सरकारचे आभार

किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना उद्योग दर्जा; केंद्र सरकारचे आभार

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने आज रिटेल व होलसेल व्यापार यांना एम एस एम ई मध्ये समाविष्ट करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला.  केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्याकडे सातत्याने भाजपा उद्योग व्यापार आघाडी महाराष्ट्र प्रदेश मार्फत करण्यात आली होती. मागणीचा पाठपुराव्याला यश मिळाले असून आता सर्व किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करता येणार आहे.  सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना मिळत असलेल्या बॅंकांच्या सवलती या सुद्धा उपलब्ध होणार आहेत. प्रामुख्याने आज पर्यंत बँका रिझर्व्ह बँकेच्या प्रियाॅरिटी लेंडिंग गाईडलाईन्स प्रमाणे फक्त उद्योगांना प्रियाॅरिटी सेक्टर मध्ये लोन दिले जात होते. आता ते किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना सुद्धा उपलब्ध होईल. भारतात जवळजवळ अडीच कोटीच्या वर व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील व्यापारी बांधवाना व पर्यटन व्यावसाईकाना या योजनेचा फायदा होणार आहे. सिंधुदूर्ग भाजप उद्योग आघाडीचा वतिने या योजनेची तालुकावार माहिती देण्यासाठी दौरा करणार असुन जास्तीत जास्त व्यापारी बांधवाना या योजनेचा फायदा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.पहिल्या लॉगडाऊन नंतर छोट्या मुदतीचे व रक्कमेचे अर्थसहाय जिल्ह्यातील फिरते व्यापारी बांधवाना सर्वात जास्त फायदा मिळवुन देण्यास उद्योग व्यापार आघाडी यशस्वी झाली होती.

नविन योजनेतील अनेक सवलती व अनेक योजना कालांतराने या क्षेत्रासाठी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे. एका अर्थाने कोरोना काळात अडचणीत आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मा. नितीनजी गडकरी यांनी संरक्षित केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पुनश्च एकदा भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्हातील सर्व व्यापारी बंधुंचे अभिनंदन व केंद्र सरकार तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व केंद्रीय सुक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे मनःपूर्वक आभार.

विजय केनवडेकर
जिल्हाध्यक्ष
उद्योग व्यापार आघाडी भाजपा सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − sixteen =