You are currently viewing श्री देव घवनाळेश्वराचा संकपृकषण विधी कार्यक्रम २७ रोजी

श्री देव घवनाळेश्वराचा संकपृकषण विधी कार्यक्रम २७ रोजी

दोडामार्ग

प्रतिवर्षी प्रमाणे साळ येथील श्री श्री देव घवनाळेश्वराचा संकपृकषण विधी कार्यक्रम २७ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. सदरचे देवस्थान साळ येथील प्रतिथयश उद्योजक व समाजसेवक मेघश्याम राऊत व कुटुंबीय यांच्या अधिपत्याखाली येत असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मेघश्याम राऊत यांनी केले आहे.

या निमित्त संकपृकषण विधी, स्थल शुद्धीकरण, लघुरुद्र, जप, हवन, ब्रम्ह होम, सत्यनारायण महापूजा, तीर्थ व महाप्रसाद, आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता महादेव मंदिराकडून देव श्री देव घवनाळेश्वर मंदिरापर्यंत पायी दिंडी निघेल व रात्रौ ९ वाजता नाईक मोचेमांडकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा नाट्य प्रयोग होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा