You are currently viewing वडाचापाट श्री शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव २८ जानेवारी पासून

वडाचापाट श्री शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव २८ जानेवारी पासून

मसुरे

मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीचा यात्रा उत्सव पौष पौर्णिमा २८ जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. कोरोना महामारीचे सावट असल्याने अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. येणाऱ्या भक्तांनी शासनाचे कोरोना संबंधित सर्व नियम पाळणे आवश्यक आहेत. नियमित होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमां सोबत ३० जानेवारी रोजी सकाळी १० ते दु. २ या कालावधीत लाइफटाईम हॉस्पिटल पडवे तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व शासनाच्या आरोग्य विभागा तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. लाभ घेण्याचे आवाहन वडाचापाट ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + sixteen =