You are currently viewing कुडाळ व मालवणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शिवगर्जना मेळावा संपन्न

कुडाळ व मालवणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शिवगर्जना मेळावा संपन्न

*महाराष्ट्रातील शिवसैनिकांप्रमाणे कुडाळ व मालवण मधील शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी राहिले याचा अभिमान – सुभाष देसाई*

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज कुडाळ तालुक्याचा शिवगर्जना मेळावा महालक्ष्मी हॉल येथे आणि मालवण तालुक्याचा शिवगर्जना मेळावा समर्थ हॉल कोळंब येथे संपन्न झाला. या मेळाव्याचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. भगवी शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन सुभाष देसाई यांचे आमदार वैभव नाईक यांनी स्वागत केले.

यावेळी सुभाष देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘निसर्गाचा ऱ्हास न होता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले आहेत. सध्याचा काळ संकटाचा असला तरी उद्धवजी संघर्ष करीत आहेत. या संघर्षाच्या वाटेत अडचणी आहेत, खाचखळगे आहेत परंतु शेवटी विजय नक्की आहे.विकास करत असतानाच प्रत्येक हाताला काम देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आम्ही पाऊले टाकत आहोत. मनात राम आणि हाताला काम हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिकांप्रमाणे कुडाळ व मालवण मधील शिवसैनिक उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. याचा आपल्याला अभिमान आहे. हि शिवसेनेने मिळविलेली संपत्ती आहे.शिवसेनेचे नाव आणि चिन्ह चोरले गेले आहे. तरीही येत्या निवडणुकांत १०० टक्के यश मिळाले पाहिजे हा निश्चय करून कामाला लागा. कुडाळ मतदारसंघ आपला हक्काचा आहे. परंतु शेजारच्या सावंतवाडी आणि कणकवलीत देखील आपले आमदार निवडून आले पाहिजेत असे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केले.

यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक म्हणाले, जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने कोणी विकास केला असेल तर ते उद्धवजी ठाकरे आहेत. सहा महिन्यापूर्वी शिवसेनेचे ९० टक्के आमदार सोडून गेले. चार दिवसापूर्वी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेले. तरीही शेकडोंच्या संख्येने शिवगर्जना मेळाव्याला लाभलेली उपस्थिती हीच ठाकरे ब्रँडची किंमत आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी आहे. शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून दिले आता तुम्ही आम्ही शिवसैनिकांनी शिवसेनेला आणि उद्धवजी ठाकरे यांना साथ देणे गरजेचे आहे. त्यासाठी किती चौकशा लावल्या, कितीही त्रास दिला तरी मी शेवट पर्यंत उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी राहणार आहे.शिवसेनेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, सांगितला जाईल तेव्हा निष्ठावंतांच्या नावाची नोंद सुवर्णअक्षरांनी केली जाईल. उद्धवजी यांनी जो विश्वास आमच्यावर दाखविला तो सार्थ ठरवणार आहोत.आज आपले मुख्यमंत्री नसतील, पालकमंत्री नसतील तरी लोकांची ताकद आपल्याकडे आहे. असे त्यांनी सांगितले.

कुडाळमध्ये यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते अरुण दुधवडकर, पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, युवानेते अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, सचिन कदम, बाळा कोरगावकर, महिला तालुका प्रमुख स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, अतुल बंगे, श्रेया परब, संतोष शिरसाट, जयभारत पालव, रुपेश पावसकर, अवधूत मालणकर आदी उपस्थित होते.

तर मालवणमध्ये प्रमुख नेत्यांसामवेत शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत,उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर,बाळ महाभोज, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, युवतीसेना कुडाळ मालवण प्रमुख शिल्पा खोत,युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले,अरुण लाड, विभागप्रमुख बंडू चव्हाण, समीर लब्दे, राजेश गावकर, कमलाकर गावडे, विजय पालव, प्रवीण लुडबे, पूजा तोंडवळकर,शीला गिरकर, सन्मेष परब, तृप्ती मयेकर, वायरी सरपंच भगवान लुडबे,कोळंब सरपंच सिया धुरी, कांदळगाव सरपंच रणजित परब,तळगाव सरपंच लता खोत,आशिष परब आदींसह दोन्ही तालुक्यातील उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभाप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथप्रमुख, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थामधील शिवसेना लोकप्रतिनिधी, निमंत्रित पदाधिकारी, सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सोसायटी सदस्य तसेच पुरुष व महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व प्रमुख नेत्यांनी पक्ष संघटना वाढीसंदर्भात आपले विचार व्यक्त करत मार्गदर्शन केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा