You are currently viewing बांदा येथे शॉर्टसर्किटमुळे विजेच्या खांबाला आग…

बांदा येथे शॉर्टसर्किटमुळे विजेच्या खांबाला आग…

वीजपुरवठा तात्काळ बंद केल्यामुळे अनर्थ टळला…

बांदा

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबावर अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या ठिकाणी बाजारपेठ असल्याने लोकांची वर्दळ मोठ्या संख्येने असते. तात्काळ विद्युत कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत वीज पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − five =