तळेखोल गावचे प्रतिभावंत कवी संदीप सुरेश सावंत राज्यस्तरीय ऑनलाईन आठोळी काव्यलेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट

तळेखोल गावचे प्रतिभावंत कवी संदीप सुरेश सावंत राज्यस्तरीय ऑनलाईन आठोळी काव्यलेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आठोळी काव्यलेखन स्पर्धेत तळेखोल गावचे सुपुत्र कवी , साहित्यिक व जि. प. प्राथमिक शाळा सासोली हेदूस वाघमळा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप सुरेश सावंत यांनी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय आठोळी काव्यलेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट मानांकन देऊन गौरव करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे सर राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर सर, मुंबई प्रदेशाध्यक्षा मा. श्रीम.राजश्री बोहरा मॅडम,नवी मुंबई जिल्हाध्यक्षा. श्रीम. जान्हवी कुंभार मॅडम, नेरुळ शहर अध्यक्षा मा.श्रीम.शबाना मुल्ला मॅडम व परीक्षिका श्रीम.हेमलता विसपुते मॅडम यांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.


याअगोदर त्यांनी विविध काव्यलेखन स्पर्धेत सुयश संपादन करून गौरवपत्र मिळवली आहे. या स्पर्धेत राज्यभरातून विविध कवी सहभागी झाले होते. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून सावंत यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा