नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे उद्या होणार शानदार उद्घाटन….

नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे उद्या होणार शानदार उद्घाटन….

भाजप प्रदेश सचिव निलेश राणे राहणार उपस्थित

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपालिकेच्या जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. तरी या उद्घाटन सोहळ्याला भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह क्रिकेटप्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्पर्धेच्या आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा