You are currently viewing आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खास जमिन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे दिनांक 21 व 22 मे 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

                शुक्रवार दि. 21 मे 2021 रोजी सायं. 5.30 वा. कुडाळ येथे आगमन व राखीव.

                शनिवार दिनांत 22 मे 2021 रोजी सकाळी 9.00 वा. कुडाळ येथून मालवणकडे प्रयाण, सकाळी 9.45 वा. मालवण येथे आगमन व तौक्ते वादळामुळे नुकसानग्रस्त भागांची पाहणी दौरा, सकाळी 10.45 वा. मालवण येथून वेंगुर्लाकडे प्रयाण, सकाळी 11.45 वा. वेंगुर्ला येथे आगमन व तौक्ते वादळामुळे नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा, दुपारी 12.00 वा. वेंगुर्ला शासकीय विश्रामगृह, ओरस येथे आगमन व राखीव, दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाची आढावा बैठक, दुपारी 1.00 वा. शासकीय विश्रामगृह ओरस येथे पत्रकार परिषद, दुपारी 2.00 वा. ओरस येथून दाबोलीम विमानतळ, गोवाकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा