अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय, कुडाळ या प्रकल्पाअंतर्गत मानधनी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी केंद्रातील मानधनी मिनी अंगणवाडी सेविका पदांसाठी संबंधित गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5.0 वाजेपर्यंत कार्यालयीने वेळेत महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, कुडाळ यांच्याकडे सादर करावेत.

                भरावयाच्या पदांची माहिती पुढील प्रमाणे आहे. पडवे – पडवे अंगणवाडी, सोनवडे तर्फ कळसुली – सोनवडे टेंबशाळा, घावनळे – घावनळे भुईवाडी येथे अंगणवाडी सेविका तर आणाव, – घाटचे पेड, वालावल – बंगेवाडी, आंगुर्ला – जुविवाडी, हुमरस – हेळ्याचे गाळु, माणगाव-मुस्लिमवाडी येथे मिनी अंगणवाडी सेविका पदे भरावयाची आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, व बाल विकास प्रकल्प कार्यालय कुडाळ येथे दूरध्वनी क्रमांक 9423053775, 9422306900 येथे संपर्क साधावा असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, कुडाळ हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा