You are currently viewing वामनराव महाडिक विद्यालय तळेरे मधील जिल्हा स्काऊट- गाईड मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी विविध कला कौशल्य स्पर्धा उत्साहात संपन्न

वामनराव महाडिक विद्यालय तळेरे मधील जिल्हा स्काऊट- गाईड मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी विविध कला कौशल्य स्पर्धा उत्साहात संपन्न

कणकवली / तळेरे:

तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे या प्रशालेमध्ये सुरू असलेल्या सिंधुदुर्ग भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था आणि शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्काऊट गाईड मेळावा दिनांक २० जानेवारी ते २२ जानेवारी या तीन दिवशी संपन्न होत आहे. या मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी विविध कला कौशल्यावर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या.

या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी बिन भांड्यांचा स्वयंपाक अशी नवोपक्रम असलेली खमंग स्वरूपाची स्पर्धा घेण्यात आली.ही स्पर्धा सर्व परीक्षकांना आवडली.

त्याच दिवशी रात्री शेकोटी कार्यक्रम हा उपक्रम घेण्यात आला.या शेकोटी कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले,याप्रसंगी तळेरे हायस्कूलचे सर्व शाळा समिती सदस्य उपस्थित होते.

यानंतर या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी रात्री प्राथमिक विभागातील स्काऊट व गाईड या पथकांची विविध सांस्कृतिक कला गुणदर्शन स्पर्धा संपन्न झाली.

आज या मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजल्यापासून योगासने,त्यांचे महत्त्व व प्रात्यक्षिके,झेंडावंदन, तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांची संचलन स्पर्धा,तंबू सजावट स्पर्धा व निरीक्षण,मातीकाम स्पर्धा,गॅझेट स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

या सर्व स्पर्धांसाठी अंजली माहुरे, जनार्दन शेळके, पांडुरंग काणेकर, अरविंद मेस्त्री, स्नेहलता राणे, सिताराम लांबर, प्रकाश कदम, नितीन सावंत, अनंत बांदेकर, लबदे सर, रोहिदास राणे, प्रशांत गोसावी, श्रद्धा कुलकर्णी, केसरकर मॅडम, मंगेश कांबळी, अर्चना बागवे, शिर्के मॅडम, धनलक्ष्मी तळेकर, केशव ढाकरे, सोमनाथ गायकवाड, दिगंबर पावसकर, धोंडू रेडकर इ.परीक्षकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

जि.प.सिंधुदुर्ग च्या वित्त व लेखा अधिकारी राजश्री पाटील यांनी स्काऊट-गाईड मेळाव्यादरम्यान दुसर्या दिवशी सकाळी सर्व विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे दिले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे शरीराला होणारे सर्व प्रकारचे फायदे तसेच त्याचे महत्त्व विशद करत प्रात्यक्षिके करून दाखवली व विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक, मानसिक आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी यावेळी केले. तसेच व्यायामाचे शरिराला होणारे फायदे पटवून दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा