You are currently viewing हायवेवर ट्रक आणि इनोव्हाची धडक ; दोन्ही वाहनांचे नुकसान

हायवेवर ट्रक आणि इनोव्हाची धडक ; दोन्ही वाहनांचे नुकसान

सुदैवाने कोणी जखमी नाही

तळेरे

गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा आणि फणसगावहून हुंबरठ च्या दिशेने चिरेवाहतुक करणाऱ्या ट्रकची कासार्डे ( ब्राम्हणवाडी ) येथे आमनेसामने धडक होऊन अपघात घडला. अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आज सायंकाळी साडेपाच च्या सुमारास हा अपघात घडला
मंगल जैस्वार ( रा.गोरेगाव ) हा आपल्या ताब्यातील इनोव्हा ( क्र.MH-05-AS – 7919 ) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. नांदगाव तिठा येथे डायव्हर्शन समजून न आल्याने मंगल इनोव्हा विरुद्ध दिशेने चालवत होता. कासार्डे ब्राम्हणदेववाडी येथे समोरून येणाऱ्या ट्रक क्र. ( MH 11 – M- 4960 ) ची इनोव्हाला धडक बसली. धडक बसल्यांनंतर सुमारे 25 फूट इनोव्हा मागे रेटत नेली. इनोव्हाचा चालकाकडील पुढील टायर फुटला तर दरवाजा फाटला होता. ट्रक चे हौसिंग बेंड झाले. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा