You are currently viewing महाराष्ट्र केवळ आर्थिक राजधानी न राहता हे राज्य शैक्षणिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात उदयास यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

महाराष्ट्र केवळ आर्थिक राजधानी न राहता हे राज्य शैक्षणिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात उदयास यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

वैभववाडी :

मुंबई विद्यापीठातंर्गत वैभववाडी तालुक्यातील तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविदयालयाचा (मॉडेल कॉलेज) परिसर शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायक, मार्गदर्शक ठरावा अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती महाराष्ट्र राज्य विद्यापीठ भगत सिंह कोश्यारी यांनी केली. त्यांच्या हस्ते आज इमारतीचे उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र.कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, मानद मार्ग निर्देशक विनायक दळवी आदी उपस्थित होते. श्री कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्र केवळ आर्थिक राजधानी न राहता हे राज्य शैक्षणिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात उदयास यावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली .

यावेळी दीपक केसरकर म्हणाले, निसर्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर मुक्त हस्ते उधळण केली आहे. भविष्यात राज्यात सिंधुदुर्ग शैक्षणिक पॅटर्न निर्माण करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत.

आमदार नितेश राणे म्हणाले, मुंबई विद्यापीठाच्या या कॅम्पसमुळे अल्पदरात विद्यार्थ्यांना चांगले व्यावसायिक प्रशिक्षण मिळेल. विदयार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल. तसेच सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व मतभेद विसरून एकत्रित येऊ. प्रारंभी कुलगुरू श्री पेडणेकर यांनी प्रास्ताविक करताना या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. विनायक दळवी यांनी ही समोयिचीत विचार व्यक्त केले. या कॅम्पस उभारणी मध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी मुंबई विद्यापीठाचे गौरव गीत सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल पाटील तर आभार प्रदर्शन प्र.कुलगुरू रविंद्र कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक श्रीपाद वेलिंग यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =