You are currently viewing आचरा रोडवर कलमठ मच्छी मार्केट नजीक लक्झरी बसला अपघात

आचरा रोडवर कलमठ मच्छी मार्केट नजीक लक्झरी बसला अपघात

कणकवली

कणकवली आचरा रोडवर कलमठ मच्छिमार्केट नजीक स्वामी रामेश्वर या लक्झरी बसला अपघात झाला. पोलीस स्टेशन पासून सुरू होणाऱ्या उतारावर ब्रेक न लागल्यामुळे ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या पोलवर आदळली.यात विजेचा पोल मोडला, विजेच्या तारा तुटल्या तर एका पान स्टॉलचे नुकसान झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही, मात्र स्वामी रामेश्वर या बसचे सुद्धा काही प्रमाणात दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात झाल्याचे समजतात दळवी कॉलनीतील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना लक्झरी तुन बाहेर काढले तर रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करत रस्ता मोकळा केला.
आज सकाळीच पाऊस सुरू झाला.त्यामुळे रस्ता ओला झाला होता.त्यात कणकवली पोलीस ठाण्या पासून सुरू होणाऱ्या उताराला मुंबई ते आचरा जाणारी एम.एच.०९एफ एल ९०९९ लक्झरी बसच्या चालकाचे कंट्रोल सुटले.त्यातच आज रविवार आल्याने कलमठ मासळी बाजारात गाड्या आणि माणसांची गर्दी होती त्यामुळे बस मच्छीमार्केट च्या आधी थांबने गरजेची होतीअन्यथा अनर्थ घडला असता, त्यामुळे रस्त्याच्या कडेला गाडी घेत असतांना विजेच्या पोलवर बस चढली आणि अपघात झाला.त्यानंतर पोलीस घटना स्थळी पोलचले, वीज कर्मचारी आले आणि गाडी बाजूला करून ट्रॅफिक मोकळे केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =