You are currently viewing मालवण तालुका शिक्षक भारती संघटनेचा ‘स्नेहमेळावा’ कांदळगावात मोठ्या उत्साहात संपन्न!

मालवण तालुका शिक्षक भारती संघटनेचा ‘स्नेहमेळावा’ कांदळगावात मोठ्या उत्साहात संपन्न!

गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच तालुक्यातील मुख्याध्यापकांचाही झाला सन्मान

तळेरे

शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेचा मालवण तालुका ‘स्नेहमेळावा’ राज्य प्रमुख कार्यवाह तथा जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या शानदार स्नेहमेळाव्याला शिक्षक भारती जिल्हा कार्यकारणीतील [vsrp vsrp_id=”” class=””]प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यामध्ये शिक्षक भारती सिंधुदुर्गचे शिक्षक भारती उपाध्यक्ष संजय नाईक, जनार्धन शेळके, सुशांत पाटील, जिल्हा सचिव सुरेश चौकेकर , कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण, जिल्हा संघटक समीर परब,जिल्हा महिला अध्यक्षा श्रीम-सुस्मिता चव्हाण, कणकवली तालुका अध्यक्ष प्रसाद मसुरकर तसेच मालवण तालुका अध्यक्ष संजय जाधव, सचिव-प्रसाद परुळेकर, मुख्य संघटक महेंद्र वारंग,संघटक अंकुश घुटुकडे,उपाध्यक्ष शैलेश मुळीक,रामलाल अहिरे, तसेच संगम चव्हाण,संजय पेंडूरकर,बाळकृष्ण वाजत्री,आपसिंग वसावे, समीर चांदरकर, रणजित बुगडे, विजय मेस्त्री, श्री.धुरे सर, साईनाथ झाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन,पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली.


गुणवंत विद्यार्थी व नुतन मुख्याध्यापकांचा गुणगौरव-

या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, नवीन पदभार स्वीकारलेल्या तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला यामध्ये दगडू जालिंदर टकले, (मुख्या,वायंगणी हाय,), गोपाळ बाळकृष्ण परब(मुख्या,न्यू इंग्लिश स्कुल आचरा.), प्रवीण बाळू घाडीगांवकर (मुख्या,जनता विद्यामंदिर,त्रिंबक), रणजित वसंत बुगडे(मुख्या, पिरावाडी हायस्कुल),अंकुश महादेव वळंजू(मुख्या, रामगड हाय), तुषार दशरथ सकपाळ (मुख्या, आडवली, हायस्कुल), प्रतापराव राजाराम खोत (मुख्या,ओझर, हायस्कुल,कांदळगाव), वामनराव खोत.(मुख्या,भंडारी हायस्कुल,मालवण) नंदकुमार कृष्णा कांबळे. (मुख्या,वराडकर हाय,कट्टा), विजय अनंत गांवकर.(मुख्या,चौके,हायस्कुल), रमेश आत्माराम मार्गी.(मुख्या,न्यू इंग्लिश स्कुल,माळगाव), नारायण धंजू पवार.(मुख्या,ज्ञानदीप विद्यामंदिर हिवाळे), वरील मुख्याध्यापक मान्यवर यांचा तसेच श्री.कुबल यांची “जूल्बी” ही शॉर्ट फिल्म आणि ही फिल्म राज्यात अव्वल ठरली. हा मानाचा तुरा एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून सिधुदुर्गच्या तुऱ्यात खोवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे तसेच ही फिल्म दर्शक व परीक्षकांना अतिशय भावली.या फिल्म मध्ये कु.दीक्षा नाईक या विद्यार्थिनीने केलेला अभिनय अतुलनीय आहे. त्याबद्दल या दोघां गुरू- शिष्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन शिक्षक भारतीच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

[
या कार्यक्रमात विद्यार्थांनी आपले मनोगत
व्यक्त केली तर मुख्याध्यापक व जिल्हा कार्यकरणीतील मान्यवरांनी उपस्थित शिक्षक बांधवाना संबोधित केले.सुरेश चौकेकर यांनी शिक्षक भारती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासन मान्य एकमेव संघटना असल्याचे अधोरेखित केले आणि या शिक्षक भारती परिवारात जास्तीत-जास्त बांधवांनी सहभागी होऊन हिरीरिने संघटीत कार्य करण्याचे आवाहन केले.

शिक्षक भारतीच्या तरुण शिलेदारांनी पुढे यावे-
संजय वेतुरेकर

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित मार्गदर्शन करताना आज शिक्षण क्षेत्रात आ वासून उभ्या असलेल्या आव्हानांची जाणीव करून दिली तसेच या आव्हानांना सामूहिक जबाबदारीने सामोरे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.त्याचबरोबर शिक्षक भारतीच्या तरुण शिलेदारांनी पुढे येण्याची गरज आहे कारण आम्ही ४-५ वर्षांनी सेवानिवृत्त होऊ त्यामुळे शिक्षक भारतीचा हा संघर्षाचा वसा तरुण पिढीने स्वतः खांद्यावर घेण्यासाठी पुढे येण्याचं भावनिक आवाहन श्री.वेतुरेकर यांनी याप्रसंगी केले.


हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक भारतीच्या महिला आघाडी प्रमुख श्रीम.कोदे यांनी आयोजकांची भूमिका निभावत कार्यक्रमासाठी स्वतःचे घर उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व शिक्षक भारतीच्या शिलेदारांची त्यांनी जेवणाची उत्तम सोय केली.
आपल्या अतिशय घोवत्या शैलीत श्री.परुळेकर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले, तर उपस्थित सर्व मान्यवर, मुख्याध्यापक,व शिक्षक भारतीच्या सर्व शिलेदारांचे तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शिक्षक भारती शिलेदारांनी ज्ञप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल मालवण तालुका मुख्य संघटक महेंद्र वारंग यांनी आभार मानून मेळाव्याची सांगता केली.

कांदळगांव : शिक्षक भारती मालवण तालुका आयोजित स्नेहमेळाव्यात सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करताना जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर, सचिव सुरेश‌ चौकेकर, महीला आघाडी अध्यक्षा सौ.सुस्मिता चव्हाण, सोबत प्रशांत आडेलकर, सी.डी चव्हाण, समीर परब व अन्य मान्यवर

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − eighteen =