You are currently viewing एमआयडीसीमध्ये भीषण आग, प्लायवूडमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे…

एमआयडीसीमध्ये भीषण आग, प्लायवूडमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे…

जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग लागलीय. फर्निचरच्या कंपनीला लागलेली ही आग वेगानं पसरल्यानं मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालीय. औद्योगिक वसाहतीतच आग लागल्यानं आजूबाजूच्या कंपन्यांनाही धोका निर्माण झालाय. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीमधील स्पेस वूड कंपनीला ही भीषण आग लागलीय. साधारणतः 12 फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि टँकर घटनास्थळी पोहोचल्या असून, अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लाय वूड तयार होत असल्यानं इथे मोठ्या प्रमाणात लाकूड आहे. आग भडकत असून, तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान प्रयत्नशील आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =