You are currently viewing शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. असा गुरुमंत्र देणारे भारतरत्न म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर — अरुण मर्गज

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. असा गुरुमंत्र देणारे भारतरत्न म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर — अरुण मर्गज

कुडाळ :

शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरु मंत्र देणारे व समाजातील तळागाळातील लोक जोपर्यंत विकासाच्या प्रक्रियेत येत नाही तोपर्यंत देशाची प्रगती झाली असे म्हणता येत नाही, असे म्हणून पददलितांच्या मुक्तीसाठी आयुष्य वेचणारे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर “.असे उद्गार प्रा. अरुण मर्गज यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यापुढील मनोगतामध्ये लोकशाहीचे कैवारी समानतेचे पुरस्कर्ते म्हणजे आंबेडकर. असा त्यांचा गौरव करत पत्रकार, वकील, दलित, बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा उपस्थितांना परिचय करून दिला. अनेक देशांच्या उत्तमोत्तम राज्यघटनांचा अभ्यास करून भारतासाठी एक अमोल, अद्वितीय अशी घटना तयार केली .भारतरत्न हा किताब त्यांच्या खऱ्या कार्याची, त्यांच्या महानतेची ओळख करून देतो, असे महामानव भारताला लाभलेले एक अनमोल रत्न आहेत. त्यांचे विचार, त्यांची शिकवण आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने, विचाराने आपण मार्गक्रमण करणे ही खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल, असे सांगत त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदरांजली अर्पण केली. यावेळी बॅरिस्टर नाथ पर्यंत महिला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य परेश धावडे, बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.कल्पना भंडारी, प्रा. प्रणाली मयेकर, प्रा. ज्योती सकीन, प्रा.रेशमा कोचरेकर, प्रा.प्रियांका माळकर, बॅ. नाथ पै ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक अर्जुन सातोस्कर एचआरओ. पियुषा प्रभूतेंडोलकर, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या सौ.स्वरा गावडे, प्रा. योगिता शिरसाट. प्रा वैशाली ओटवणेकर, प्रा.पल्लवी हरकुळकर, प्रा.प्रथमेश हरमलकर, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा