You are currently viewing कणकवलीचे कर्तव्यदक्ष तहसिलदार रमेश पवार यांची देवगडला बदली

कणकवलीचे कर्तव्यदक्ष तहसिलदार रमेश पवार यांची देवगडला बदली

कणकवली :

 

तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना (कोकण विभाग) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी आज कोकण विभागातील १४ तहसीलदारांच्या बदल्याचे आदेश पारित केले आहे. ३ जुलैला बदलीचे ठिकाणी हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यात कणकवलीचे कर्तव्यदक्ष तहसिलदार रमेश पवार यांची देवगडला बदली झाली आहे.

कणकवली तहसीलदार कार्यालय परिसर सुशोभीकरण,७५ फूट उंचीचा झेंडा करत एक वेगळा आदर्श तहसीलदार रमेश पवार यांनी ठेवला आहे.महसूल सेवा देताना कामाचा निपटारा आणि प्रशासकीय गतिमानता ही एक प्रकारची शिस्त होती.गेली अनेक वर्षे कणकवली तलाठी,मंडळ अधिकारी,नायब तहसीलदार आणि तहसीलदार या पदांवर काम केलं आहे.आता त्यांची बदली देवगड तहसीलदार म्हणून झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =