राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक तालुका अध्यक्षपदी अन्वर साटी यांची नियुक्ती…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक तालुका अध्यक्षपदी अन्वर साटी यांची नियुक्ती…

कणकवली

कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग सिंधुदुर्ग च्या कणकवली तालुका अध्यक्ष पदी अन्वर सुमार साटी याची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देत श्री.साटी यांचे अभिनंदन करण्यात आले.

कलमठ येथील पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी ही निवड करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हाकृषीध्यक्ष समीर आचरेकर, तालुकाध्यक्ष राजू पावसकर, युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग, मंगेश दळवी, संदेश मयेकर, सतीश जाधव, रवींद्र चव्हाण आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्या पर्यंत पोहोचवून पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी आपण कार्यरत रहाणार असल्याचे अन्वर साटी यांनी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा