You are currently viewing स्वच्छता अभियानात सहकार्य,सावंतवाडी क्रीडाईचा पालिकेकडून सन्मान…

स्वच्छता अभियानात सहकार्य,सावंतवाडी क्रीडाईचा पालिकेकडून सन्मान…

सावंतवाडी

शहरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात मोलाचे योगदान देणाऱ्या क्रीडाई सावंतवाडी या संस्थेचा सत्कार सावंतवाडी पालिकेच्या वतीने करण्यात आला. यावेळी अध्यक्ष नीरज देसाई यांचा सन्मान मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केला. सावंतवाडी पालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात क्रीडाई सावंतवाडीच्या वतीने सहकार्य करण्यात आले होते. राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमात त्यांचे योगदान मोठे होते.त्यामुळे पालिकेला स्वच्छता अभियानात चांगले यश मिळाले आहे. याचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा सन्मान करण्यात आला असे श्री जावडेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − one =