You are currently viewing ठाकरे सरकारकडून आज 1 वाजता मोठ्या घोषणेची शक्यता..

ठाकरे सरकारकडून आज 1 वाजता मोठ्या घोषणेची शक्यता..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना आणि नववर्षाचं स्वागत यासोबतच नाताळ यासंदर्भात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काही नवी नियमावली जाहीर होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून मेट्रो कारशेड हस्तांतरणावरुन विरोधक ठाकरे सरकारला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आजच्या संवादामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना काय उत्तर देणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महविकास आघाडीवर सरकारकडून होणारे आरोप यासर्वाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.

 

एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. अशात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात पेटून उठले आहेत. त्यामुळे या सगळ्यावरून काही मोठा निर्णय घेतला जाणार आहे का हे पाहणं आता जनतेसाठी महत्त्वाचं असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − five =