You are currently viewing केंद्राच्या इन्स्पायर अवॉर्डसाठी मुणगेच्या भगवती हायस्कूलची निवड

केंद्राच्या इन्स्पायर अवॉर्डसाठी मुणगेच्या भगवती हायस्कूलची निवड

देवगड
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलच्या चिन्मय दयानंद तेली या विद्यार्थ्याची केंद्र शासनाच्या इन्स्पायर अवार्ड साठी निवड झाली आहे. या स्पर्धेत भाग घेताना चिन्मयने भात मळणी यंत्र आपल्या वडिलांच्या मदतीने बनविले होते. पारंपरिक पद्धतीपेक्षा कमीत कमी वेळात भात झोडणी होऊन एकाच वेळी मळणी व वारवणी आदी पूरक गोष्टी या यंत्राद्वारे सहज होतात. त्याच बरोबर ही कामे या यंत्रांच्या मदतीने एक किवा दोन माणसे सहज करू शकत असल्याने आर्थिदृष्टया बचत होते. चिन्मय याला प्रशालेचे विज्ञान शिक्षक प्रसाद बागवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

निवड झाल्याने त्याला दहा हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. चिन्मय हा हिंदळे गावचे ग्रामपंचायत सदस्य दयानंद तेली यांचा मुलगा असून त्याच्या यशाबद्दल श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, माजी कार्याध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, मुख्याध्यापक संजय बांबुळकर, व्यवस्थापक आबा पुजारे यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 7 =