You are currently viewing नशीब सार्थकी लावणाऱ्या बंगल्यात आज बसणार अंदर बाहर……

नशीब सार्थकी लावणाऱ्या बंगल्यात आज बसणार अंदर बाहर……

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगाऱ्यांनी फणसगाव विजयदुर्ग, बांदिवडे, खारेपाटण, कणकवली अशी मजल दरमजल करत सावंतवाडी तालुक्यातील गोव्याच्या हद्दीजवळ आरोस, कोंडुरा तिठ्या जवळच्या पारिजात मंगल कार्यालया पासून १०० मीटर वरील नशीब *सार्थकी* लावणाऱ्या बंगल्यात नवीन अड्डा सुरू केला आहे. नशीब सार्थकी लावणारा हा बंगला बाहेरगावी राहणाऱ्या व्यक्तीचा असून ती मोठी आसामी असल्याचे समजते.
यापूर्वी सार्थकी लावणाऱ्या बंगल्यात बैठक बसली होती, परंतु मळेवाड पंचक्रोशीतील स्वतःला समाजसेवक म्हणवणारा आणि जनसेवेसाठी आंदोलने करणारा त्या बैठकीला आडवा आला. बैठक बसवायची असेल तर त्याने २५०००/-च्या मांसाहाराची मागणी केली. तकशीम घेणाऱ्यांना त्याची मागणी अवास्तव वाटल्याने तो शाकाहारी असा विचार करून त्याला ५०००/- रुपयात भागविण्याचा प्रयत्न केला. परंतु ५०००/- रुपयात समाधानी न झालेला या राजकीय वलय असलेला समाजसेवकाने पोलीस तक्रार देण्याची धमकी दिली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बसणारी बैठक रद्द झाली.
आज जुगारी आणि तथाकथित समाजसेवक यांच्यात पैशांची मांडवली होऊन आज संध्याकाळी ४.०० वाजता तकशीम घेणाऱ्यांनी पारिजात मंगल कार्यालय जवळच्या नशीब *सार्थकी* लावणाऱ्या बंगल्यात जुगाराचा अड्डा सुरू करण्याचे ठरविले आहे. *स्वतःला समाजसेवक, राजकीय पुढारी म्हणवणारे महागड्या गाड्यांमधून फिरणारे इकडच्या खबरी तिकडे पोचवणारे असे समाजसेवक जुगाऱ्यांकडून हफ्ता घेऊन समाज सुधारणार आहेत का?*
कोंडुरा येथे सुरू होणाऱ्या बैठकीत सातोशेचा आबलो, दादागिरी करणारा अरुण, नाईकांचो हसीन, तिठ्या वरचा दुकानांवर विजय मिळविणारा, रेडे वाला इसम, बेल वाहतात तो शंभू, कवठणीचा संतुला अशा लोकांची तकशीम आहे. सातार्डा, पासून आजूबाजूच्या परिसरातील बरेच अट्टल जुगारी तिथे आपले नशीब सार्थकी लावणार आहेत. एका जुगाऱ्यातल्या गुरू देवाने तर स्वतःच्या बायकोचे दागिनेसुद्धा जुगारात विकले आहेत. आयुष्यात काही कमविण्यापेक्षा इज्जत सुद्धा गमावलेल्या लोकांना राजकीय वलय असणाऱ्या व्यक्तींकडून हफ्ता घेऊन गैरधंदे करण्यास प्रोत्साहन दिले जाते हे नक्कीच शर्मनाक आहे.
दिवसेंदिवस गैरधंद्यातून मिळणाऱ्या पैशातून वाढणारी आंबोली घाटासारखी प्रकरणे ताजी असतानाच पोलीस सुद्धा भररस्त्यावर सुरू असणाऱ्या धंद्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे समाजात वाईट प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि यालाही कारणीभूत आहेत ते माहिती मिळूनही डोळेझाक करणारे पोलीस प्रशासन.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − two =