You are currently viewing मा. मुख्यमंत्री यांच्या निर्देशनुसार मा. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळासोबत होणार बैठक

मा. मुख्यमंत्री यांच्या निर्देशनुसार मा. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळासोबत होणार बैठक

मा. मुख्यमंत्री यांच्या निर्देशनुसार मा. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळासोबत होणार बैठक

*मा. आमदार पडळकर साहेब, मा. आमदार सदाभाऊ खोत साहेब यांच्या उपस्थित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघांचे शिष्टमंडळ बैठकीसाठी उपस्थित राहणार*

*मा.सतीशदादा मेटकरी सरचिटणीस 33 व्या दिवशी बैठकी दरम्यान उपोषण स्थळी निर्णय होई पर्यंत उपोषण चालू ठेवणार*

कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी 32 दिवसापासून सेवा संघर्ष एस टी कर्मचारी संघांचे सरचिटणीस मा.सतीशदादा मेटकरी यांनी प्रलंबित 16 मागण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरण उपोषण चालू केले होते.आज या उपोषणाची दखल घेत मा.उद्योग मंत्री मा. उदय सामंत साहेबांनी सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघासोबत बैठक घेण्यासाठी उद्या दि.3 फेब्रुवारी 2024 रोजी 11.30 वाजता मुंबई येथे आयोजित केली आहे. या बैठकीसाठी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले.सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाकडून *मा. आमदार गोपीचंद पडळकर साहेब, मा. आमदार श्री सदाभाऊ खोत साहेब. उपस्थित राहून कामगारांना आनंदाची बातमी देणार आहोत.

भाजपा वेंगुर्ले कार्यालयात माहिती देताना कामगार आघाडी कोकण विभाग अध्यक्ष लिलाधर भडकमकर , कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक राणे , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , सेवा शक्ति संघर्ष कामगार संघ विभागीय कार्याध्यक्ष श्री संतोष भाट, विभागीय उपाध्यक्ष श्री भरत चव्हाण, विजयदुर्ग आगार सचिव श्री रोहन शिंदे, वेंगुर्ला आगार सचिव श्री दाजी तळवणेकर, श्री भावू सावळ, श्री मनोज दाभोळकर, श्री अनंत झोरे, श्री विनायक दाभोळकर, श्री योगेश प्रभुखानोलकर, श्री रामचंद्र पालकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा