You are currently viewing शिराळे व नावळे मध्ये जियो नेटवर्क उपलब्ध करून देणार – आ. नितेश राणे यांचे आश्वासन

शिराळे व नावळे मध्ये जियो नेटवर्क उपलब्ध करून देणार – आ. नितेश राणे यांचे आश्वासन

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे पं.स.मतदार संघातील नावळे – शिराळे गावाना नेटवर्कची खुप अडचण निर्माण झाली आहे. ऑनलाईन शिक्षणाचा फ़ज्जा उडाला आहे. विद्यार्थी, विद्यार्थींनीना रात्री अपरात्री अभ्यासासाठी जंगलात लांब नेटवर्क शोधावे लागतेय. या गोष्ठी मुळे या गावातील विद्यार्थी, विद्यार्थींनीला जंगली जनावरांपासुन धोका निर्माण होतोय पण जंगलात फ़िरुन ही टॉवर अभावी नेटवर्क ही मिळत नाही. तसेच नेटवर्क नसल्यामुळे कोणालाही अत्यावशक सेवेसाठी संर्पक होत नाही.  अश्या सर्व बाबी लक्षात घेता, या गावातील जनतेच्या मागणी नुसार खांबाळे पं.स.मतदार संघातील मतदार या नात्याने मी नवलराज विजयसिंह काळे ग्रा.पं.सदस्य सडुरे शिराळे तथा वैभववाडी तालुका सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा आपणास निवेदन करतो की खांबाळे पं.स.मतदार संघातील नावळे व शिराळे गावांच्या नेटवर्क चा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, सदर गावांना नेटवर्क साठी BSNL, JIO, IDEA, ARTEL यापैकी कोणत्याही कंपनीचा टॉवर उपलब्द करुन द्यावा. व पंचक्रोशीतील जनतेच्या अडचणी दुर कराव्यात अशी मागणी भाजपचे युवा नेते ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली. 40-45 ग्रामस्थांच्या सही सहित काळे यांनी निवेदन दिले.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी जिओ कंपनीच्या माध्यमातून या दोन्ही गावांना नेटवर्क उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − six =