You are currently viewing मनसेच्या दणक्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालया ॲक्शन मोडवर.

मनसेच्या दणक्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालया ॲक्शन मोडवर.

मनसेच्या दणक्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालया ॲक्शन मोडवर.

सावंतवाडी

या पूर्वी हॉस्पिटलमध्ये विनामूल्य रुग्णांना सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर खोटा आरोप करून जिल्हा सिस्टर युनियन लीडर यांनी राजकीय व्यक्ती व सामाजिक कार्यकर्ते यांनी हॉस्पिटलमध्ये येऊ नये अशी ताकीद दिली होती. कारण सामाजिक कार्यकर्त्यांकडून रुग्णांना सेवा मिळत असल्यामुळे त्यांच्या कामात अडथळा होतो असा होता खोटा आरोप त्यांनी केला होता त्यामुळे विनाकारण बदनामी नको म्हणून सामाजिक कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये जाण्याचे बंद झाले आणि पुन्हा रुग्णांचे अशा पद्धतीने हाल व्हायला सुरू झाले.
मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात काल रुग्णांसाठी फळ वाटपचा कार्यक्रम ठेवला होता. 24 तासापूर्वी ऍडमिट झालेल्या रुग्णांची डॉक्टरांकडून तपासणीच झाली नसल्याचे चित्र समोर आले तसेच हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेचाही अभाव दिसूनआणि त्याच प्रसंगी हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या बेड खाली विषारी साप ही आढळून आला होता हे चित्र पाहून मनसेचे जिल्हाध्यक्ष
ॲड.अनिल केसरकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून डॉक्टर व प्रशासनाला खडे बोल सुनावले होते रुग्ण व स्वच्छता बाबत कुठच्याही प्रकारची दिरंगाई त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. त्यानंतर या विषयाची गांभीर्याने गंभीर दखल घेऊन हॉस्पिटल परिसर तात्काळ स्वच्छ करण्यात आला व आजूबाजूची झाडी ही मारण्यात आली त्याचप्रमाणे प्रत्येक दोन तासाने पेशंटकडे विशेष लक्ष देण्यात आले असे पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांनी माहिती दिली.
आजपर्यंत अशा पद्धतीने दखल घेणाऱ्या मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांन कडून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा