You are currently viewing बागायत, माळगांव, बिळवस येथील BSNL टॉवर नादुरुस्त!

बागायत, माळगांव, बिळवस येथील BSNL टॉवर नादुरुस्त!

लाईट जाताच रेंज होतेय गायब

 

 

मसुरे :

बागायत, माळगांव,बिळवस येथील BSNL टॉवर सेवेत व्यत्यय येत असून वीज पुरवठा खंडित झाल्या नंतर पूर्ण रेंज जात आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी वैधकीय सुविधा किंवा अकस्मात नैसर्गिक संकट आल्यास संपर्क साधण्यासाठी मोबाइल महत्वाची भूमिका बजावतो. तसेच आर्थिक व्यवहार, ऑनलाईन फॉर्म भरणे, वैगरे कामांसाठी मोबाइल नेटवर्क अत्यावश्यक बनले आहे. बागायत टॉवरचा वीज पुरवठा खंडित झाल्या नंतर नंतर लगेचच माळगाव, बिळवस या टॉवर वरून मिळणारी रेंज सुद्धा गायब होत असल्याने हे टॉवर शोभेचे ठरत आहेत. लाईट आल्या नंतर सुद्धा अर्ध्यातासाने पूर्णपणे रेंज या टॉवर वरून मिळत असल्याने माळगाव,बागायत, बिळवस सह पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थांसाठी मोबाइल टॉवर शोभेचे ठरत आहेत. ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा अधिकारी वर्गाचे लक्ष वेधण्यात आले असून तातडीने या टॉवरची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + eight =