You are currently viewing मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा करण्याचे पालिकेचे नागरीकांना आवाहन

मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा करण्याचे पालिकेचे नागरीकांना आवाहन

मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा करण्याचे पालिकेचे नागरीकांना आवाहन

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपरिषदेकडून दि. ०१ जानेवारी २०२४ पासून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता व पाणीपट्टी कर विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील नागरीकांनी आपला मालमत्ता कर व पाणीपट्टी वेळेत नगरपरिषद कार्यालयात येवून किंवा वसुली पथक जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा भरणा करावी. तसेच कर भरणा केल्याची पावती संबंधीत कर्मचाऱ्याकडून घ्यावी.

तसेच सदर मोहीमेअंतर्गत नगरपरिषदेचे कार्यालय दिनांक २३ मार्च ते २५ मार्च या सुट्टीच्या कालावधीत देखील सावंतवाडी शहरातील नागरीकांच्या सोयीसाठी कर भरणा करण्याकरीता सुरू ठेवण्यात येणार आहे.

ज्या मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी कर भरणा केलेला नाही अशा १९० मालमत्ता धारकांच्या मालमत्तांवर महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औदयोगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १५२ अन्वये जप्ती अधिपत्र बजावून कर वसुलीची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. तसेच थकीत नळपट्टी असणाऱ्या २० धारकांचे नळकनेक्शन खंडीत करण्यात आलेले आहे.
तरी नागरीकांनी वरील प्रकारची कारवाई टाळण्यासाठी आपला मालमत्ता व पाणीपट्टी कर ३१ मार्च पूर्वी भरणा करावा असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा