कासार्डेतील पुजा पाळेकरची राष्ट्रीय योग स्पर्धेसाठी निवड

कासार्डेतील पुजा पाळेकरची राष्ट्रीय योग स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय ऑनलाइन योगा स्पर्धेत अभिनंदन यश

तळेरे

कणकवली तालुक्‍यातील कासार्डे गावच्‍या कासार्डे तर्फेवाडीतील कु.पूजा पाडूरंग पाळेकर हिने राज्यस्तरीय योगासनामध्‍ये मुलींमध्ये अभिनंदनीय यश मिळविले आहे.
पूजाचे आई पल्‍लवी व वडिल पांडुरंग हे शेतकरी आहेत. शेतकरी आईवडिलामुळे ती त्यांच्याबरोबरच नेहमी शेतात शेत कापणी , भात झोडणे व झाडावर कसे चढावे याचे शिक्षण व बाळकडू लहानपणापासून घरात मिळाल्यामुळे तिचा आपोआप शारीरिक व्यायाम हेात गेला. तसेच तिच्‍या लवचीक शरीरामुळे शाळेत आठवीत असताना शाळेतील मैत्रिणीच्या घरीच पाहून पाहून योगासनाचे धडे मिळाल्यामुळे ती योगासनामध्‍ये पारंगत झाली. गेल्या वर्षी तिने कासार्डे माध्यमिक विद्यालयात अकरावीत शिकत असताना जिल्हास्तरीय योगासनामध्‍ये कास्‍य पदकही मिळवले. त्यानंतर तिने योगासनामध्‍ये लक्ष केंद्रित करून रोज योगासनाचा सराव घरीच सुरू ठेवला आहे. याकामी आईवडिलानी तसेच कासार्डे माध्यमिक विद्यालयातील योगशिक्षक संजय भोसले सरांनी तिला वेळोवेळी प्रोत्साहित केले.कोरोनाचा काळ असूनसुद्धा तिने नुकत्याच फेब्रुवारी- मार्च मध्ये झालेल्या महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या (महाराष्ट्र राज्य) कडून ऑनलाईन वैयक्तिक योगासनासाठी सिंधुदुर्गामधून ज्युनिअर्स मुलींमधून तीने हे यश संपादन केले आहे.या यशाबद्दल
सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिला योगशिक्षक संजय भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
तीच्या या यशाबद्दल देवगड पंचायत समिती सभापती रवि पाळेकर यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तीच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा