You are currently viewing प्रचंड गर्मीच्या दिवसात महावितरण खेलतेय लोकांच्या आरोग्याशी

प्रचंड गर्मीच्या दिवसात महावितरण खेलतेय लोकांच्या आरोग्याशी

*प्रचंड गर्मीच्या दिवसात महावितरण खेलतेय लोकांच्या आरोग्याशी*.

*प्रशासनाची आरोग्य विषयक जाहीरात ही फक्त जाहिरात बाजी करण्यापूर्तीच*

सावंतवाडी

*सद्यस्थितीत संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून सतत विजेचा खेळ खंडोबा चालू असून ही गोष्ट सर्वांनाच त्रासदायक असून मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांच्या तब्येतीसाठी त्रासदायक ठरत आहे*.
*प्रशासनाकडून मागील काही महिने सतत दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत नागरिकांनी बाहेर न पडण्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात येत असून याच दरम्यान लाईट बंद करण्यात येत आहे व त्याचा त्रास आजारी तसेच वयस्कर माणसाना होत आहे. सद्य स्थितीत वातावरणात उष्णता इतकी वाढली आहे की या उष्णतेने हृदय विकाराचा झटका येऊ शकतो व या गर्मीवर सर्वसामान्य लोकांकडे पंखा वापरणे हा एकमेव पर्याय आहे*. *या बद्दल जनतेने विद्युत महावितरण अधिकाऱ्यांना विचारले असता पावसाच्या कामांची पूर्वतयारी चालू आहे असं उत्तर देत टाळाटाळ करताना निदर्शनास येत आहे* . *बिल उशिरा भरल्यास ज्या ग्राहकांना हेच विज वितरणचे अधिकारी त्रास देतात त्यांना या उन्हाळ्यात नेमकी ग्राहकांची दया येत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे*. *जे अधिकारी स्वतः एसी केबिन मध्ये बसून दिवस घालवण्याचे काम व महावितरणचा गलेलठ्ठ पगार घेण्याचे काम करतात* *त्या अधिकाऱ्यांना सामान्य जनतेची व्यथा कशी समजणार ?*
*आणि जर पावसाळ्याचे काम आता सुरू करत असाल तर ह्या आधी झोपला होता का की फक्त वातानुकूलित कार्यालयात बसून आराम करत होता असा सवाल उपस्थित होत आहे*.*तसच आता लाईट बंद करून महावितरण जर पावसाळ्याची पूर्व तयारी करत असेल तर पावसाळ्यातसुद्धा यांची अशीच बोंब असते*. *त्यामुळे आता तरी महावितरणने वेळीच या गोष्टीला आवर घालून दुपारच्या वेळेस लाईट बंद करणे टाळावे व पावसाळ्यात सुध्दा ग्राहकांना योग्य ती सेवा द्यावी*
*उगाच सेवा न देता वसुलीचा तगादा लावू नये.अन्यथा उन्हाचा त्रास सामान्य जनतेला काय होतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ असं इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार जी जी उपरकर समर्थक मंदार नाईक यांनी दिला*

प्रतिक्रिया व्यक्त करा