पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र राज्याचा 61 व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर पोलीस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. कोविड – 19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने साधेपणाने ध्वजवंदन करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने कोरोनाचे सर्व नियम पाळून साध्या पद्धतीने आजचे ध्वजवंदन संपन्न झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा