You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आजचा अतिशय महत्वाचा दिवस…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आजचा अतिशय महत्वाचा दिवस…

स्वतःच्या भवितव्यासाठी वेळ द्यायलाच हवा..

आज संपूर्ण जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस असून CRZ आराखडा/नकाशे यावर ई जन सुनावणी नागरिकांच्या मनाविरुध्द होणार आहे.. जिल्हा प्रशासन केवळ वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत आहे असे दिसत असले तरी प्रत्यक्षात १४ फेब्रुवारीला केलेल्या तीन चार प्राथमिक मागण्या अजुनही पूर्ण झालेल्या नाहीत. पालकमंत्री आणि खासदार यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केलेले नाही याचे आश्चर्य वाटते.
जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांचा CRZ कायद्याला विरोध नाही. ही अत्यंत महत्त्वाची बाब जिल्हा प्रशासन का दुर्लक्ष करतेय याचा उलगडा होत नाही. केंद्र सरकारने CRZ पॉलिसी व आराखडा पूर्ण देशासाठी बनविला आहे. प्रत्येक राज्य सरकारने त्यांच्या प्रादेशिक भाषे मध्ये त्याचे भाषांतर करून प्रत्येक बाधित कुटुंबा पर्यंत जन जागृती होण्यासाठी देण्याचे निर्देश दिलेले आहेत. परंतु आपल्या जिल्ह्यात असे वारंवार मागणी करूनही झालेले नाही..
*आठ महिने लागतात मराठी भाषांतर करण्यासाठी..????*
लोकांना जर कायदाच समजला नाही किंवा प्रशासनाने पुढाकार घेवून समजावले नाही तर गरीब, गरजू, शेतकरी, आर्थिक दुर्बल आणि वंचित लोकांना आपली भूमिका, अडचणी, हरकती, आक्षेप, मत, प्रश्न, मागण्या, विचार, शंका कसे काय मांडू शकतील ही साधी गोष्ट कशी कळत नाही..
कोण आहोत आम्ही, देशाच्या बाहेरून आलेले उपरे नागरिक की यू पी, बिहार वाले परकीय लोंढा घेवुन प्रत्येक राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या लोकांचा लवाजमा घेवुन मतदान करणारे आतंकवादी.. खरंच आज एक मोठा प्रश्न पडलाय की स्थानिक भूमिपुत्रांच्या अडचणी का समजुन घेतल्या जात नाहीत आजही..????
आम्हाला तुमचा कायदा प्रेमाने समजावून सांगा ही एक कळकळीची विनंती करूनही केराची टोपली दाखवली जाते जिल्ह्यातील भूमिपुत्रांना..
जे आज ऑनलाईन जन सुनावणी घेणार आहेत ना त्यांची एक इंच सुद्धा जमीन अथवा जागा या बाधित क्षेत्रामध्ये नाही. मग कसा फरक पडेल ना त्यांना.
ज्याचं जळत त्यालाच कळत ही जुनी म्हण आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी फार पूर्वीच सांगितली आहे.
आजच्या ई जन सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहून आपली भूमिका परखडपणे मांडणे आवश्यक असून जिल्हा नियोजन समिती सभागृह, ओरोस येथे जास्तीत जास्त भूमिपुत्रांनी उपस्थित राहून आपला आक्षेप नोंद करावा तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म वर हजारो नागरिकांनी लिंक डाऊनलोड करून आजची ई जन सुनावणी सहभाग घ्यावा..
पुढील २ पिढ्यांचे जीवनमान चांगले ठेवायचे असेल तर प्रत्येक कुटुंबातील जबाबदार लोकांनी आपले योगदान देणे क्रमप्राप्त आहे अन्यथा जिवंतपणी नरकयातना भोगण्याची तयारी ठेवा पुढील ४०/५० वर्ष..
स्वतःच्या भवितव्यासाठी आज तुम्ही वेळ दिलाच पाहिजे नाहीतर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही..

CRZ जिल्हास्तरीय जन जागृती व समन्वय समिती, सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 14 =