२४ मे रोजी ‘लागले खूळ कलावंताला’ अभिवाचन मैफल
पिंपरी
रुद्रंग, निगडी, पुणे या संस्थेच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ठीक ०५:३० वाजता कॅप्टन कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे ‘लागले खूळ कलावंताला…’ या रमेश यशवंत निर्मित विशेष अभिवाचन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी आणि गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष अभिवाचन मैफलीला चिखली येथील प्रज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक संस्थेचे कार्यवाह यादवेंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून नागेश जोशी, उज्ज्वला केळकर, सागर यादव, किशोरी सरीन, अरुणा वाकनीस, डाॅ. हेमंत हुईलगोळकर, स्मिता कुलकर्णी आणि रमेश वाकनीस हे विविध साहित्यप्रकारांचे अभिवाचन करतील. विनाशुल्क असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन निमंत्रक रुद्रंग आणि अनुसंधान कला संस्था परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
