You are currently viewing शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडून दोडामार्ग तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडून दोडामार्ग तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा

दोडामार्ग :

 

महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर यांनी रविवारी सायंकाळी तिलारी धरणाला भेट देऊन धरणातील वाढता पाणी विसर्ग तसेच तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना कुठल्याही प्रकारची हानी पोहचवू नये याची आवश्यक ती काळजी घेऊन आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी अशी सूचना जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्या सह उपस्थित अधिकारी यांना दिल्या तसेच आवश्यक माहिती जाणून घेतली.

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातील पाणी विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे या भागातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी सावंतवाडी विधानसभा आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी रविवारी सायंकाळी तिलारी येथील धरणातील पाणी विसर्ग येथील धरणाला तसेच मुख्य धरणाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी मुख्य धरण, सॅडल डॅम, पुच्छ कालवा, आदींची पाहणी केली.

यावेळी प्रांताधिकारी, पानशेतकर दोडामार्ग तहसीलदार संकेत यमकर, तिलारी कालवा जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता विनायक जाधव, उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, गोपाळ गवस, तिलकांचन गवस, योगेश महाले, बाबाजी देसाई, रामदास मेस्त्री, संदीप गवस, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी धरणाच्या ठिकाणी भेट देऊन संबंधित जलसंपदा विभाग कार्यकारी अधिकारी यांच्याकडून धरणातील पाणी साठा तसेच पाणी साठा विसर्ग नदीकाठच्या गावांना काय सूचना, संदेश दिल्या याबाद्दल माहिती घेतली. तसेच पूर परिस्थिती निर्माण होऊ नये याची दक्षता घ्या जर पाऊस वाढला काही गंभीर समस्या निर्माण झाली तर आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी अशा सूचना संबंधित अधिकारी दोडामार्ग तहसीलदार यांना दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा