You are currently viewing वैभववाडी – नायदेकातकरवाडी मार्गे भुईबावडा एस.टी. बस सेवा आज पासून सुरू

वैभववाडी – नायदेकातकरवाडी मार्गे भुईबावडा एस.टी. बस सेवा आज पासून सुरू

वैभववाडी-:

वैभववाडी-रेल्वेस्थानक – नायदेकातकरवाडी मार्गे भुईबावडा अशी एस.टी.बस सेवा आज पासून (2 मार्च) सुरू होत आहे. या बस फेरीसाठी परिवहनमंञ्यांकडे खासदार अरविंद सावंत यांनी मागणी केली होती. वैभववाडी रेल्वे स्टेशनवरुन भुईबावडा विभागात जाण्यासाठी बस सेवा नव्हती. त्यामुळे मुंबईवरुन येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात वैभववाडी रेल्वे स्टेशन ते नायदे कातरकरवाडी भुईबावडा बस फेरी सुरु करावी.अशी मागणी ब्राम्हणदेव सेवा मंडळ नायदेवाडी उंबर्डे गेली अनेक वर्षे करीत होते. त्याला खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिसाद देत परिवहन मंञी अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या आदेशानुसार आज पासून ही बस फेरी सुरु करण्यात येत आहे.

मुंबई ते मांडवी रेल्वे गाडी वैभववाडी रेल्वे स्टेशनवर दुपारी २.३० वाजता पोहचेल त्यानंतर ही गाडी वैभववाडी रेल्वे स्टेशनवरुन भुईबावड्यासाठी सुटेल. ब्राम्हणदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश मुद्रस, सचिव बाळकृष्ण मुद्रस, खजिनदार संजय शिरसाट आदी पदाधिका-यांनी यासाठी प्रयत्न केले होते. ही बस फेरी सुरु झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची सोय होणार असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + fifteen =