You are currently viewing कणकवली शहरातील आरक्षण क्रमांक २७, २८ यामधील गार्डन कामाचे भूमिपूजन

कणकवली शहरातील आरक्षण क्रमांक २७, २८ यामधील गार्डन कामाचे भूमिपूजन

कणकवली शहरातील आरक्षण क्रमांक २७, २८ यामधील गार्डन कामाचे भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर

कणकवली :

शहरातील स्पोर्ट कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या आरक्षण क्रमांक २७, २८ यामधील गार्डन करणे या कामाचे भूमिपूजन कणकवली तालुका भाजपचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या विकास कामासाठी सुमारे ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या गार्डनचे काम करत असताना या ठिकाणी विहिरीचे काम देखील केले जाणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

दरम्यान कणकवली शहरात शासनाच्या व केंद्रीय मंत्री नारायण राणे आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून चौफेर विकास होत असताना शहरवासीयांना मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज असे गार्डन करण्याची मागणी वारंवार होत होती. पण ही मागणी या निमित्ताने पूर्णत्वास जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन शनिवारी मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभि मुसळे, शिशिर परुळेकर, अजय गांगण, अभय राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, महेश सावंत, माजी नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, शहराध्यक्षा प्राची कर्पे, गणपत मालंडकर, प्रदीप सरूडकर, अनिल अणावकर, विठ्ठल मालंडकर, अनिल कर्पे, पंकज पेडणेकर, राजा पाटकर, नवु झेमणे, व्यंकटेश सावंत, ओंकार राणे आदी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 4 =