You are currently viewing विश्वकर्मा जयंती निमित्त कोलगाव-सुतारवाडीत उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन

विश्वकर्मा जयंती निमित्त कोलगाव-सुतारवाडीत उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन

विश्वकर्मा जयंती निमित्त कोलगाव-सुतारवाडीत उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका श्री विश्वकर्मा सुतार मंडळाच्यावतीने श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त गुरुवारी २२ रोजी कोलगाव चव्हाटानजीक सुतारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता विश्वकर्मा पूजन, सकाळी १० वाजता उद्घाटन, दुपारी १२.३० वाजता विद्यार्थ्यांचा गुणगौरव, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ३ वाजता हळदीकुंकू, ४ वाजता विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम, ७ वाजता माऊली दशावतार मंडळा (इन्सुली) चे नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शंकर मेस्त्री, अमिदी मेस्त्री, संतोष मेस्त्री यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 2 =