You are currently viewing गणित वेळेचे

गणित वेळेचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम लेख*

🕰️ गणित वेळेचे 🕰️

आपल्या संस्कृतीत वेळेला फार महत्व आहे. प्रात: काळी उठण्याची वेळ, जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ एवढेच काय पुजेची वेळ खेळण्याची वेळ सुद्धा आपण पाळतो. वेळा पाळा आणि निरोगी रहा कारण वेळा पाळण्याचा आरोग्याशी संबंध आहे. प्राप्तकालची वेळ पाळली की आपल्या शरीराला मनाला वळण लागते. जेवण्याची वेळ पाहिली की पोट दुखत नाही, शांत राहतात. झोपण्याची निश्चित वेळ शरीराला खरा विसावा देते. चित्त शुद्ध व प्रसन्न राहण्यासाठी पूजेची वेळ जरूर पाळावी. एकदा का वेळ पाळायची सवय शरीर व मन दोघांनाही लागली की हेच दोघे सर्वकाही करवून घेतात. उठण्याची वेळ झाली की मन सांगत असतं फक्त शरीराने आळस करायचा नाही. असेच प्रत्येक वेळी मन आठवण करून देत असतं. तर मुख्य हेतू हा आहे की वेळ पाळली की शरीर व मन तंदुरुस्त होऊन निरोगी व आनंदी राहता येतं. वेळ काढून समोरच्याचेही मन जिंकता येतं. अमिताभ नाही का वेळेचा पक्का आहे म्हणतात, तसे वेळेची कारणे देणारे पण आहेतच. काय करू व्यायामाला वेळ मिळत नाही, वेळेअभावी अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी सोडून देतात. पण खरं सांगू का वेळा पाळणे हा पण एक संस्कारच आहे. चांगली वेळ वाईट वेळ आपल्याला अनुभव देऊन जाते. म्हणतात ना वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात गुरु शिकवण परीक्षा घेतात वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते.
Life and time are world’s two teachers,
Life teaches us to make good
चला तर मग use of time,
While time teaches us the value of life
आजकालच्या पिढीचे हाल आपण बघतो आहोत. वेळेचे गणित चुकले आहे संपूर्ण जीवनक्रम बदलून जातो. त्यामुळे आरोग्य संपदा खालावली आहे. धनलक्ष्मी प्रसन्न आहे पण आरोग्य लक्ष्मी प्रसन्न करण्याकरिता आपल्याला आयुष्यात काटेकोरपणा आणावाच लागेल. कारण एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते. पण कधीकधी सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ द्यावा लागतो.
Time Health and Relations do not come with price tags, when we lose them we realize them…

चला तर मग आपण संकल्पच करूया. अहो मुहूर्त साधायचा ना वेळेचा वेळ निघून गेली तर आयुष्य निघून जाईल.
Time management is Health management…
तुम्हा आम्हा सर्वांना निरोगी दिर्घायुष्य लाभो
चला हिच ती वेळ हाच तो क्षण.

सौ. अनघा अनिल कुळकर्णी🙏
पुणे.

 

*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा