You are currently viewing जिल्हा रुग्णालयातील तो आवाज स्फोटाचा नाही – जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्हा रुग्णालयातील तो आवाज स्फोटाचा नाही – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सेंट्रल ऑक्सिजन लाईन पुरवठा यंत्रणेला ऑक्सिजन सिलेंडर जोडताना कनेक्टर योग्य प्रकारे घट्ट न बसल्यामुळे भरलेल्या ऑक्सिजन सिलेंडरमधील उच्चदाबाने वायू बाहेर आल्याने मोठा आवाज झाला होता. त्यामुळे तो आवाज स्फोटाचा नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले आहे.
जिल्हा रुग्णालयातील डेडीकेटेड कोविड सेंटरसाठी कार्यान्वीत केलेली सेंट्रल ऑक्सिजन लाईन सिस्टीम आङे. त्यात दर तासाला १० जंम्बो सिलेंडर असताता व ते जोडण्यासाठी मॅनिफोल्ड लावलेले असतात. आज दि. ३ मे २०२१ रोजी पहाटे दोन कनेक्टर जंम्बो सिलेंडल लावत अशताना सुटून सिलेंडरमधील कंम्प्रेस्ड गॅस दाबामुळे एक मोठा आवज झाला. या आवाजामुळे सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आहे. पण, प्रत्यक्षात स्फोट झालेला नसून सेंट्रल ऑक्सिजन लाईन पुरवठा यंत्रणेला ऑक्सिजन सिलेंडर जोडताना कनेक्टर जोडताना योग्य प्रकारे न बसल्यामुळे गॅस उच्चदाबाने बाहेर आल्यामुळे मोठा आवाज झाला. ऑक्सिजन सिलेंडरमधील वायू हा अज्वलनशील असल्याने कोणतीही इजा, गुदमरणे व जीवित हानी, स्फोट असा कोणताही प्रकास घडला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − eighteen =