You are currently viewing मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते रॉकस्टार अवधुत गुप्तेचा सत्कार

मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते रॉकस्टार अवधुत गुप्तेचा सत्कार

पुढील महिन्यात सावंतवाडी महोत्सव; म्युझिकल फाऊंटन उद्घाटन

अवधुत गुप्ते यांचे आजोळी होणार पुन्हा स्वागत..

 

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाच्या ५ व्या व शेवटच्या दिवशी संगीतकार तथा रॉकस्टार अवधुत गुप्ते यांची संगित मैफिल आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते अवधुत गुप्तेचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अवधुत गुप्ते यांनी आपल्या सावंतवाडी तालुक्यातील शहरालगत असलेल्या मळगांव ब्राम्हणआळी येथील आजोळच्या आठवणींना उजाळा दिला. आपण लहान पणापासून दरवर्षी गणपतीला मळगांव येथे आजोळी येतो. सावंतवाडी शहरातही येतो. यापूर्वीही सावंतवाडी महोत्सवात आपण कार्यक्रम सादर केला होता असे सांगितले.

सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक झाली नसल्याने गेली काही वर्षे होऊ न शकलेला सावंतवाडी महोत्सव पुढील महिन्यात मोती तलावाच्या काठावर होणार असून या कार्यक्रमाला अवधुत गुप्ते यांना परत बोलावणार असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहिर केले.

यावर लवकरच म्हणजे पुढील महिन्यात मोती तलावात मंजूर करण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटनचे उद्घाटन करणार असून या उद्घाटनाला तुम्हाला बोलावणार आहे व त्याच वेळी सावंतवाडी महोत्सव देखील घेण्यात येणार असून तुमच्या गायनाच्या तालावर हा फाऊंटन नाचेल असेही केसरकर म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उप जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, तहसिलदार श्रीधर पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =