You are currently viewing 13 जुलै रोजी जि.प., पं. स. मतदार संघासाठीची आरक्षण सोडत

13 जुलै रोजी जि.प., पं. स. मतदार संघासाठीची आरक्षण सोडत

 

कुडाळ :

जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठीची प्रभागआरक्षण सोडत 13 जुलै रोजी होणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी तहसीलदार कार्यालय येथे सोडत होणार आहे.

सोडतीनंतर आरक्षणाची प्रारूप अधिसूचना 15 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून 21 जुलै पर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. प्राप्त हरकती व सूचना अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्यांकडून 25 जुलै पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असून राज्य निवडणूक आयोगाकडून 29 जुलै पर्यंत या आरक्षणाला मान्यता देण्यात येणार आहे.

त्यानंतर दोन ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे. या आरक्षणात अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांच्याकरिता जागा आरक्षित करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 8 =