You are currently viewing बांदा येथील नाबर स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

बांदा येथील नाबर स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

बांदा

येथील नाबर प्रशालेत नुकताच सुरू झालेला सीबीएसई, आईसिएसई व स्टेट बोर्डचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम हा नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहे. दृकश्राव्य, प्रात्यक्षिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवला जाणारा हा अभ्यासक्रम आहे आणि या अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे धडे ग्रामीण भागातील मुलांना देखील मिळत आहे. इयत्ता सहावी पासूनच शालेय अभ्यासाला व्यावसायिक शिक्षणाची जोड मिळाल्याने ही मुले भविष्यात नक्कीच यशाची उच्च शिखरे गाठतील असे गौरवोदगार भोसले एज्युकेशन सोसायटी सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी नाबर प्रशालेच्या स्नेहसंमेलनात केले.

येथील नाबर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री भोसले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश कामत, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी पंचायत समिती सभापती शितल राऊळ, माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा सावंत, साई काणेकर, आबा धारगळकर, रिया येडवे, दीपलक्ष्मी पटेकर, अन्वर खान, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य मनोज कामत, भिकाजी धुरी, उद्योजक शशी पित्रे, भाऊ वळंजू, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. होमी भाभा परीक्षेत व सायन्स ओलिम्पियड परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या प्रशालेच्या मधुरा जगदीश पाटील तसेच पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या भक्ती महाजन यांचा गुलाबपुष्प, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापिक शिल्पा कोरगावकर यांनी प्रशालेतील विविध उपक्रमांचे स्लाईड शोच्या माध्यमातून सादरीकरण केले.

विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर, ऐतिहासिक, महिला सबलीकरण, सामाजिक समस्या व जनजागृती पर अप्रतिम नृत्ये, विनोदी नाटके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. दहावीच्या विद्यार्थ्यांचा विविधतेतून एकता दर्शवणारा फॅशन शो तसेच सातवीच्या विद्यार्थ्यांची वारकऱ्यांची दिंडी हे कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिशा रॉड्रिग्ज आणि सांस्कृतिक समिती सदस्य व शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =