You are currently viewing ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे येथे आकाश कंदील व नरकासूर स्पर्धेचा शुभारंभ..

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे येथे आकाश कंदील व नरकासूर स्पर्धेचा शुभारंभ..

युवा उद्योजक विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजप प्रवक्ते संजू परब यांच्या हस्ते शुभारंभ

 

सावंतवाडी :

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे आयोजित आकाश कंदील व नरकासूर स्पर्धेचा शुभारंभ युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजप प्रवक्ते संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला.

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे ने दिवाळीनिमित्त आकाश कंदील व नरकासूर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा शुभारंभ सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संजू परब यांनी मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतला विधान परिषद व विधानसभा आमदार यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी रुपये पंचवीस लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले. गावात एवढे मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा आयोजित करून गावातील स्थानिक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देत असल्याबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक केले.

उद्योजक विशाल परब यांनी आपले मत व्यक्त करत असताना, मळेवाड हा गाव केंद्रबिंदू असून या गावाला एक विशेष महत्त्व आहे. हा गाव गोव्या पासून जवळ असल्याने दर दिवशी शेकडो लोक कामानिमित्त गोव्यात जातात. याचा विचार करून गावातील तरुण-तरुणीं च्या हाताला जवळच काम मिळावे यासाठी मळेवाड परिसरात एखादा नवीन उद्योग सुरू करण्याचा मानस असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामपंचायत अतिशय चांगले उपक्रम करत असून आपण सर्व गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना सहकार्य करावे असे आवाहनही केले.गावातील जेष्ठसामाजिक कार्यकर्ते गुरु मुळीक यांनी आपले मत व्यक्त करत असताना मळेवाड कोंडुरे गाव हा विकासाच्या दृष्टीने आगेकूच करत असताना गावाच्या विकासाचा आलेख हा चढताच आहे. गावात नवनवे उपक्रम राबवले जात असून याचे सर्व श्रेय नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य जाते असे सांगितले.

ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना ग्रामपंचायत च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जात असून उपसरपंच हेमंत मराठे यांच्या मार्गदर्शना खाली आपण सर्वजण एक मताने गावाच्या विकासासाठी काम करत असून भविष्यातही गावाच्या विकासाचा आलेख हा चढता ठेवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. बाळा शिरसाठ यांनी आपले मत व्यक्त करत असताना स्पर्धेचे अतिशय सुंदर असे आयोजन केले असून गावाच्या विकासासाठी संजू परब यानी ग्रामपंचायतला विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे आवाहनही केले. सरपंच मिलन पार्सेकर यांनी स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत उपस्थित ग्रामस्थ व रसिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

या शुभारंभ प्रसंगी ग्रा प सदस्य अमोल नाईक, महेश शिरसाट, कविता शेगडे, सानिका शेवडे, संदीप नेमळेकर, आल्हाद नाईक, गुरुप्रसाद नाईक, नंदू नाईक, बाळा शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक नाना नाईक, पांडुरंग गावडे, रमाकांत नाईक, परशुराम मुळीक, गजानन शिरसाट, तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, प्रकाश पार्सेकर, मनोज सातार्डेकर, सतीश सातार्डेकर, गजानन शिरसाट, हेमंत बांदेकर, अंगणवाडी सेविका मानसी सातार्डेकर, पूर्वा नाईक, समीक्षा नाईक, संगीता माळकर, आशा अनुष्का नाईक, सीआरपी तेजश्री पेडणेकर, ईशा काळोजी, सौ मुळीक आदी उपस्थित होते.

उपसरपंच हेमंत मराठे यांनी आभार प्रदर्शन करत असताना गावात गेल्या दीड वर्षात 47 लाखाचा निधीची कामे गेल्या दीड वर्षात मंजूर करून आणल्याचे सांगितले तसेच गावाचा विकासाचा आलेख चढता असून मळेवाड कोंडूरे गाव हा जिल्ह्यात नाहीतर राज्यात एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा सर्वांचा मानस असल्याचे मत व्यक्त केले. तसेच गावाला आतापर्यंत 10 लाख 95 हजार रुपयांची बक्षीसे प्राप्त झाली असून या पुढेही अनेक स्पर्धांच्या माध्यमातून गावाला यश मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संजू परब यांनी कोरोना काळात गावाला विलगिकरण कक्षासाठी बेड उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत मराठे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा